देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पक्षनिरीक्षकांच्या ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली. ही बैठक प्रशांत मुसमाडे यांच्या राहुरी फॅक्टरी येथील संपर्क कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान पक्षनिरीक्षकांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, काही इच्छुक उमेदवारांसोबत प्राथमिक चर्चा करून स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी, निवडणुकीतील रणनीती, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षनिरीक्षकांनी बाबासाहेब मुसमाडे यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिल्याचे समजते.
शिवसेनेच्या या बैठकीमुळे देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला एक नवी गती मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत