विवाह नोंदणीसाठी राहुरीकरांचा त्रास वाढला; ऑनलाइन प्रणालीचा अभाव ठरत आहे डोकेदुखी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विवाह नोंदणीसाठी राहुरीकरांचा त्रास वाढला; ऑनलाइन प्रणालीचा अभाव ठरत आहे डोकेदुखी

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आजही प्रशासकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. शासना...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

राहुरी शहरातील नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आजही प्रशासकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्वत्र क्यूआर कोड असलेले ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य केले असताना, राहुरी नगरपरिषद संलग्न ग्रामीण रुग्णालयातून अजूनही ऑफलाइन प्रमाणपत्रे दिली जात आहेत. परिणामी, अनेक शासकीय कामे खोळंबत असून नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढला आहे.

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नवीन आधार कार्ड तयार करणे, पासपोर्ट मिळवणे आदी शासकीय प्रक्रियांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र राहुरीतील ऑफलाइन प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याने नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, ग्रामपंचायत हद्दीतील जोडप्यांना फक्त सात दिवसांत ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र मिळते, तर शहरातील नागरिकांना महिनोन्‌महिने प्रतीक्षा करावी लागते. इतकेच नव्हे तर, ग्रामीण भागातील प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रेही नगरपरिषद क्षेत्रापेक्षा कमी आहेत.

स्थानिक नागरिकांनी या विसंगतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाइन होत असताना राहुरी शहरातील विवाह नोंदणी अजूनही ऑफलाइन पद्धतीने होत असल्याचे प्रशासनाचे अपयश आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

नागरिकांची मागणी आहे की, राहुरी नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयाने तातडीने ऑनलाइन विवाह नोंदणी प्रणाली सुरू करून क्यूआर कोडसह प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून सर्व शासकीय कामे विनाअडथळा पूर्ण होतील.

राहुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागावे नागरिकांना ऑनलाइन विवाह नोंदणी प्रणाली सुरू करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत