राहुरीत चिदंबर महास्वामी जन्मोत्सव सोहळा,प्रवचनमाला व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत चिदंबर महास्वामी जन्मोत्सव सोहळा,प्रवचनमाला व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

(राहुरी : श्रेयस लोळगे) श्री गुरु स्वामी समर्थ मठ, उंडे वस्ती, बारागाव नांदूर रोड येथे चिदंबर महास्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्...

(राहुरी : श्रेयस लोळगे)

श्री गुरु स्वामी समर्थ मठ, उंडे वस्ती, बारागाव नांदूर रोड येथे चिदंबर महास्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ४:३० ते ६:३० या वेळेत सद्गुरु बाबा महाराज भागवत संजीवन समाधी संस्थान, श्रीक्षेत्र देवपूर (सिन्नर) येथील ह.भ.प. डॉ. कल्पेश महाराज भागवत यांचे ‘श्रीकृष्ण लीलाचरित्र’ या विषयावर प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवचनानंतर दररोज संध्याकाळी ६:४५ वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे.

तसेच दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत चिदंबर महास्वामी जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून काल्याचे कीर्तन, जन्मोत्सव सोहळा, पाळणा, महाआरती व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन चिदंबर महास्वामी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत