मुंबई/वेबटीम:- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने आज, मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता स्थानिक स्वराज्य संस्थां...
मुंबई/वेबटीम:-
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या वतीने आज, मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ही पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत मंत्रालय परिसरातील सचिवालय, जिमखाना येथे पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबतची माहिती, तयारी, आचारसंहिता आणि अन्य महत्त्वाचे निर्णय याबाबतचा आढावा या परिषदेत सादर होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती आहे.
स्थळ: सचिवालय, जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई-३२
वेळ: दुपारी ४.०० वाजता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत