राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये उद्या बुधवारी बंपर लकी ड्रॉ कोण होणार बुलेटचा मानकरी? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये उद्या बुधवारी बंपर लकी ड्रॉ कोण होणार बुलेटचा मानकरी?

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-   ग्राहकांच्या विश्वासाचा ११ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केलेल्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे भव्...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


 ग्राहकांच्या विश्वासाचा ११ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केलेल्या राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे भव्य बुलेट सोडत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता मुख्य शाखा, नगर–मनमाड हायवे, राहुरी फॅक्टरी येथे पार पडणार आहे.


ग्राहकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ओम इलेक्ट्रॉनिक्सने नेहमीच ग्राहकांसाठी आकर्षक योजना राबविल्या आहेत. या वर्षी बंपर बक्षीस म्हणून रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल देण्यात येणार असून, सोडत समारंभासाठी सर्व सहभागी ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जे ग्राहक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांनी Instagram Live वर Omelectronics_ या पेजवरून सोडत कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


या सोडत समारंभामुळे राहुरी परिसरातील ग्राहकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, “कोण होणार बुलेटचा मानकरी?” हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत