(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्रातील राजकारणातील एक ज्येष्ठ, मातीतले नेते शिवाजीराव कर्डिले यांचे वय...
शिवाजीराव कर्डिले हे राहुरी तालुक्यातील राजकारणात एक प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. कायम जनतेच्या संपर्कात राहणारे, कार्यकर्त्यांमध्ये नेहमी सक्रिय असलेले हे नेते आता काळाच्या पडद्याआड गेले.
पोटनिवडणुकीची शक्यता निश्चित
आ. कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली असून, भारतातील लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 151(अ) नुसार ही जागा पुढील सहा महिन्यांच्या आत भरली जाणे आवश्यक आहे, जर संबंधित सदस्याचा कार्यकाळ एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी शिल्लक असेल. यानुसार, राहुरी मतदारसंघासाठी येत्या काही महिन्यांत पोटनिवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
पोटनिवडणुका – एक परिचित प्रक्रिया
भारतात पोटनिवडणुका ही नवी बाब नसून अनेक वेळा विविध कारणांमुळे – जसे की सदस्याचा मृत्यू, अपात्रता किंवा एका उमेदवाराचा दोन ठिकाणी विजय – यामुळे जागा रिक्त होते आणि पोटनिवडणुका जाहीर केल्या जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढले होते, त्यापैकी एक जागा रिक्त केल्यामुळे तेथे पोटनिवडणूक झाली होती.
पुढे काय?
राहुरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या मार्गावर असून, पुढील काही महिन्यांत उमेदवारांचे नाव, प्रचाराचे स्वरूप आणि राजकीय पक्षांचे डावपेच यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय वारसदार चिरंजीव अक्षय कर्डिले की,पत्नी अलकाताई कर्डिले? यावरही चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
राहुरी तालुक्यातील जनतेला आता नव्या आमदाराच्या रूपात आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळणार आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डीले यांची लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही निवडणूक केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकारणावरही प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत