राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आज निर्णय देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राहु...
राहुरी (प्रतिनिधी) –
राहुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आज निर्णय देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन गु.र. नं. 1722/2020 भा.द.वि. कलम 302, 504 प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय 38, रा. आंबी स्टोअर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याने त्याची पत्नी शीतल बाबासाहेब गोलवड (वय 35) हिला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ करून लाकडी दांड्याने कपाळावर मारहाण करून ठार मारले होते.
या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल माननीय श्री. सी. एम. बागल, जिल्हा न्यायाधीश क्र. 2, अहमदनगर यांच्या न्यायालयात आज (दि. 07 नोव्हेंबर 2025) विशेष खटला क्र. 25/2021 मध्ये देण्यात आला. न्यायालयाने आरोपी बाबासाहेब गोलवड यास नमूद गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा उत्तम तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन बागुल यांनी केला असून सरकारी वकील श्री. घोडके साहेब यांनी सरकारतर्फे खटल्याचे कामकाज पाहिले.
न्यायालयीन कारवाईदरम्यान कोर्ट पेरवी अंमलदार पोहेकॉ/1000 मुकतार कुरेशी, तसेच कोर्ट ड्युटी अंमलदार पोकॉ योगेश वाघ व मपोका सांवत यांनी सहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत