देवळाली प्रवरा(वेबटीम ) राहुरी : राहुरी तालुक्याच्या इतिहासामध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारणासाठी वेळोवेळी मतदारांचा वापर करून राहुर...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी : राहुरी तालुक्याच्या इतिहासामध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारणासाठी वेळोवेळी मतदारांचा वापर करून राहुरी तालुका हा विकासापासून वंचित ठेवला आहे. आपापली सत्तास्थान अबाधित ठेवण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांनी विरोधकांसोबत अनेक निवडणुकीमध्ये साठे-लोटे केल्याचे अनेकदा स्पष्ट झालेले आहेत. पुढाऱ्यांच्या अशा धोरणांमुळे राहुरी शहरासह तालुक्याचा विकास खोळंबला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पुरोगामी पक्ष व संघटना एकत्र येऊन बहुजन क्रांती आघाडी या नावावर राहुरी नगरपरिषदेच्या सर्व जागा लढवणार असल्याचा निर्धार संजय संसारे यांनी केला आहे.
राहुरी नगरपरिषदेचे निवडणुकीचे वारे वाहत असताना मागील निवडणुकीमध्ये राहुरी शहरातील एक चतुर्थांशपेक्षा अधिक मते घेऊन सत्ताधारी पक्षांना आव्हान निर्माण करणाऱ्या बहुजन क्रांती आघाडी या पॅनलची दि. ६ नोव्हेंबर रोजी राहुरी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पॅनलचे मुख्य समन्वयक संजय संसारे यांनी बहुजन क्रांती आघाडी राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सर्व जागा ताकतीनिशी लढवणार असल्याचे सांगितले. राहुरी नगर परिषदेच्या इतिहासामध्ये मागील निवडणुकीमध्ये राहुरी शहरासह तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध पक्ष संघटना एकत्र येत बहुजन क्रांती आघाडी नावाचा पॅनल बनवण्यात आला होता. यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी, संभाजी ब्रिगेड, एमआयएम, श्रमिक मुक्ती दल, रिपब्लिकन सेना, बामसेफ, भीम आर्मी,ओबीसी महासंघ यासह आदी संघटनांचा सहभाग होता.
राहुरी येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीमध्ये राहुरी नगरपरिषद निवडणूक व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका बहुजन क्रांती आघाडी या नावावर लढवण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. यावेळी एमआयएमचे इमरान देशमुख म्हणाले की, तालुक्यात मुस्लिम द्वेष वाढत असताना मुस्लिमांवर नेहमी हल्ले झाले. मुस्लिमांच्या दर्ग्यावर हल्ले झाले. परंतु सत्ताधाऱ्यांनी फक्त बघायची भूमिका घेतली व मुस्लिमांना कोणतेही सहकार्य केले नाही. त्यांनी मुस्लिमांना अस्पृश्यतेची वागणूक दिली. अशा बिकट परिस्थितीत मुस्लिम समाज असताना आंबेडकरी चळवळीतील बहुजन क्रांती आघाडीतील सर्व पुरोगामी संघटनांनी मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम केले. हे मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही. तो परिवर्तनासाठी बहुजन क्रांती आघाडी सोबत असणार आहे, असे देशमुख म्हणाले. यावेळी बाबा साठे, डॉ. जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, नाथा अल्हाट, युवराज पारडे, अशोक जगधने, विश्वास जगधने, अमर सातुरे, सूर्यकांत वाघचौरे, गुराभाई कुरेशी, विक्रम बोरुडे, महेश साळवे यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत