राहुरी/वेबटीम:- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा.खासदार डॉ स...
राहुरी/वेबटीम:-
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा.खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली टाकळीमिया येथील प्रगतशील शेतकरी,युवक सामाजिक कार्यकर्ते श्री गोपीनाथ सोनवणे यांची राहुरी तालुका भाजपा किसान आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे संचालक श्री शामराव निमसे व भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा ग्रामीण चे अध्यक्ष श्री डॉ आशिषराव बिडकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी श्री ज्ञानदेव निमसे, श्री संजय विधाटे, जिजाबा चिंधे, नानासाहेब निमसे, सुरेश निमसे, गोरक्षनाथ शिंदे, गोपीनाथ जुंदरे, बाळासाहेब माळवदे, विजय जुंद्रे, बाबासाहेब सोनवणे, बाळासाहेब जुंदरे,भागवत नवाळे, अशोकराव कवाने, प्रताप निमसे,शिरीष निमसे, विलास निमसे,शफिक शेख, रावसाहेब निमसे, रामा मोकळे,रामभाऊ तारडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत