देवळाली प्रवरातील सेंट मेरी कॅथोलिक चर्च येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील सेंट मेरी कॅथोलिक चर्च येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा..

  देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील सेंट मेरी युवक मंडळाच्या वतीने  सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नाताळ सण साजरा करण्यात...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



येथील सेंट मेरी युवक मंडळाच्या वतीने  सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नाताळ सण साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश रात यांनी उपस्थिताना प्रभू येशूने शिकविलेल्या मार्गाने कसे चलावे याबाबत चांगले मार्गदर्शनपर प्रवचन केले. यावेळी सेंट मेरी चर्चला छान सजवण्यात आले आहे. तसेच चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 



या प्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधील निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी आरपआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीशभाऊ वाळुंज, डॉ. प्रवीण कोठुळे, नगरसेविका सौ. सुनीता थोरात हे प्रमुख उपस्थित होते. त्याच बरोबर सेंट मेरी युवक मंडळाने नाताळ सनानिमित्त १ जानेवारी पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन चर्च कमिटीने केले आहे.




कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित पंडित, प्रशांत संसारे, अमित पंडित, अक्षय संसारे, प्रकाश पंडित, ऍड ऋषी पंडित, विल्सन पंडित, प्रदीप पंडित, सचिन बोर्डे, अमृत संसारे, अंश मनतोडे, गीतेश ओहळ, सचिन पंडित, दिगंत पंडित, शुभ मनतोडे बबलू शिरसाठ यांच्या सह सेंट मेरी महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार ऍड. विशाल संसारे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत