देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल भाजपाच्या वतीने आज मिरवणूक, विजयी पदयात्रा व आभार सभेचे आयोजन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल भाजपाच्या वतीने आज मिरवणूक, विजयी पदयात्रा व आभार सभेचे आयोजन कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

देळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तसेच लोकनियुक...

देळाली प्रवरा/वेबटीम:-


देवळाली प्रवरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सत्यजित कदम तसेच 15 नगरसेवक नगरपरिषदेत निवडून दिल्याबद्दल सर्व कार्यकर्ते यांच्या समवेत शहरात विजय पदयात्रा व मिरवणूक तसेच आभार सभेचे आयोजन आज गुरुवार २५ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

या मिरवणूक व पद यात्रेसाठी कै.अण्णासाहेब कदम पुतळा सोसायटी डेपो येथे दु.२.३० कार्यकर्ते जमणार असून विजयी सभा ही बागायत पीक सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.

तरी कार्यकर्ते हितचिंतक नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत