राहुरी फॅक्टरीत शिवनेरी क्लब च्या वतीने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत शिवनेरी क्लब च्या वतीने जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी श्रीशिवाजी नगर येथे शिवनेरी क्लबतर्फे शिवनेरी चषक जिल्हास्तरीय हॉलीबॉल  स्पर्धेचे २८ डिसेंबर २०२५ र...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी श्रीशिवाजी नगर येथे शिवनेरी क्लबतर्फे शिवनेरी चषक जिल्हास्तरीय हॉलीबॉल  स्पर्धेचे २८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे.

 स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिकाचे १५ हजार ५५५ रुपयांचे प्रायोजक नगराध्यक्ष सत्यजित कदम, द्वितीय पारितोषिक १२ हजार २२२ प्रायोजक साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, तर तृतीय पारितोषिक ९ हजार ९९९ रुपयांचे  प्रायोजक नगरसेवक राजेंद्र लोखंडे हे आहेत.

बेस्ट स्मॅशर, बेस्ट सेटर आणि बेस्ट लिबरो अशी प्रत्येकी ₹१००१ ची वैयक्तिक पारितोषिके नगरसेवक वसंत कदम यांनी प्रायोजित केली आहे. 


स्पर्धेसाठी ट्रॉफी, पाणी व बॉल सोय अनुक्रमे आदित्य वैरागर, ओंकार गागरे, महेश मुंढे व व अक्षय भांगरे यांनी केली आहे.


 या स्पर्धेचे आयोजन श्री. राजेंद्र पुजारी सर व शिवनेरी क्लब, श्रीशिवाजीनगर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत