किरण पागिरे यांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किरण पागिरे यांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा परिसरातील ३१ वर्षीय किरण दिलीप पागिरे हे गंभीर आजाराशी झुंज देत असून त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेश...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा परिसरातील ३१ वर्षीय किरण दिलीप पागिरे हे गंभीर आजाराशी झुंज देत असून त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक आलेल्या आजारामुळे किरनची प्रकृती चिंताजनक झाली असून वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

किरणच्या उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना समाजाकडून मदतीची तातडीची गरज आहे. त्यांच्या मदतीसाठी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने पुढाकार घेत आर्थिक सहकार्याचे आवाहन केले आहे.

किरणसाठी मदत कशी करू शकता?

आर्थिक मदत: किरनच्या उपचारांसाठी दिलेला प्रत्येक रुपया मोलाचा ठरणार आहे.

प्रार्थना: नागरिकांनी किरनच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन मित्रपरिवाराने केले आहे.

संदेश शेअर करा: अधिकाधिक लोकांपर्यंत मदतीचे आवाहन पोहोचावे यासाठी हा संदेश शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मदत पाठविण्यासाठी UPI विवरण देण्यात आले आहेत. इच्छुकांनी संपर्कासाठी किरनचे मोबाईल क्रमांक 9067707007 वर संपर्क साधावा, असे मित्रमंडळाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत