राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मकर संक्रांत व एकादशी या अतिशय पवित्र योगावर गोमातेच्या सेवेतून समाजाला सद्भावना आणि एकोप्याचा संदेश देणारा सुंदर उप...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
मकर संक्रांत व एकादशी या अतिशय पवित्र योगावर गोमातेच्या सेवेतून समाजाला सद्भावना आणि एकोप्याचा संदेश देणारा सुंदर उपक्रम गोपाल कृष्ण गोशाळेत सायंकाळी साडेपाच वाजता पार पडला. संक्रांतीच्या तिळगुळासारखी गोडी आणि एकादशीच्या पावित्र्याची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमात गोमातेचे पूजन, दर्शन व अन्नदानासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गोसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला.
तनपुरे परिवाराकडून प्राप्त सुमारे १०० किलो दाळ गोमातेस अर्पण करून मान्यवरांच्या शुभहस्ते गोसेवेची परंपरा जपण्यात आली.
आज मकर संक्रांत व एकादशी या अतिशय पवित्र दिवशी गोपाल कृष्ण गोशाळेच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्ण मुसमाडे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे काँग्रेस गटनेते दासू भाऊ पठारे, काँग्रेसचे मार्गदर्शक वैभव गिरमे, कॉन्ट्रॅक्टर लांबे साहेब तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव घाडगे यांचा गोशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी गोशाळेच्या नवीन इमारतीची पाहणी मान्यवरांनी केली. कार्यक्रमास गोशाळेचे उपाध्यक्ष आर. डी. धोंडे पाटील, निलेश तनपुरे, युवा कार्यकर्ते बंटी लोंढे, कोबरणे साहेब, जालूभाऊ आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत