देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा आमदार हेमंत ओगले यांच्याकडून सन्मान करण्य...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा आमदार हेमंत ओगले यांच्याकडून सन्मान करण्यात आला आहे.देवळाली प्रवरा येथील जनसंपर्क कार्यालयात हा सन्मान पार पडला.
यावेळी नवनियुक्त नगरसेवक तथा महाविकास आघाडीचे गटनेते तुकाराम उर्फ दासू पठारे,शरद वाळुंज, सुनीता थोरात,वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक संतोष चोळके यांचा सन्मान आमदार ओगले यांनी केला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर,डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे,बाळासाहेब खांदे,वैभव गिरमे ,ललित चोरडिया,प्रशांत काळे,सुनील विश्वासराव,किशोर पंडित आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत