राहुरी फॅक्टरीत उद्यापासून गणेश जयंतीनिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन कार्यक्रमाचे ध्वजारोहण संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्यापासून गणेश जयंतीनिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन कार्यक्रमाचे ध्वजारोहण संपन्न

राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:- गणेश जयंतीचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने उद्यापासून त्रिदि...

राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-

गणेश जयंतीचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरीतील गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने उद्यापासून त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा ध्वजारोहण संपन्न झाला. हा धार्मिक सोहळा सोमवार दि. २० जानेवारी ते बुधवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

कीर्तन महोत्सव महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक,ह.भ.प पांडुरंग महाराज वावीकर यांच्या आशीर्वादाने तसेच गायनाचार्य ह.भ.प. संपत काका महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार सहभागी होणार असून भक्तांना अध्यात्मिक लाभ मिळणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. आबासाहेब महाराज कोळसे यांचे प्रवचन व ह.भ.प. महेश महाराज खाटेकर (आळंदीकर) यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांचे प्रवचन तर ह.भ.प. पुजाताई महाराज गीते यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.तर तिसऱ्या दिवशी ह.भ.प. सीमाताई महाराज आहेर यांचे प्रवचन व सायंकाळी ह.भ.प. सोमनाथ महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन महोत्सवाची सांगता होणार आहे.

दररोज सकाळी गणपती अथर्वशीर्ष पठण, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पावन गणपती प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत