कात्रड येथे जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यशस्वी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कात्रड येथे जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यशस्वी

राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील कात्रड परिसरातील दांगटवस्ती येथील ८५ वर्षीय गजाबापु नाथु दांगट यांच्या घरात २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील कात्रड परिसरातील दांगटवस्ती येथील ८५ वर्षीय गजाबापु नाथु दांगट यांच्या घरात २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता चार अनोळखी आरोपी घुसले होते. आरोपींनी धारदार हत्यार दाखवून, घरातील सोने–चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास केले आणि फिर्यादी व साक्षीदारांवर मारहाण केली. 

 पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस निरीक्षक  किरणकुमार कबाडी यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. 


त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळी रवाना करण्यात आले.


तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी नेवासा फाटा परिसरात आरोपी रघुवीर विरुपन भोसले व  त्याचा साथीदार दिनेश विरुपन भोसले यांना सापळा रचून ताब्यात घेतले गेले. रघुवीर विरुपन भोसले यांनी कबुली दिली की, हा गुन्हा त्याने  दिनेश विरुपन भोसले, तिरंगा कडू उर्फ फादर काळे, बदाम कडु उर्फ फादर काळे व महेश नंदन उर्फ नंदू काळे,आवकाश गोपीनाथ काळे (सर्व रा. शिरोडी, ता. गंगापुर) आदींनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत