राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वैराग्यमूर्ती संत शिरोमणी वामनभाऊ महाराज (गहिनीनाथ गड) यांच्या ५० व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दिनांक ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
वैराग्यमूर्ती संत शिरोमणी वामनभाऊ महाराज (गहिनीनाथ गड) यांच्या ५० व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल शास्त्री महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन होणार असून,त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत