राहुरी फॅक्टरी(वेबटीम) बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून प्रस्थान ठेवून श्रीक्षेत्र शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या साई पालखी सोहळ्याचे ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून प्रस्थान ठेवून श्रीक्षेत्र शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या साई पालखी सोहळ्याचे आज शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी राहुरी फॅक्टरी येथे आगमन होणार आहे. या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चेतक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या साई पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात येते. यावर्षीही राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर चेतक चौक (महावीर जनरल स्टोअर्सजवळ, कारखाना कॉलनी) येथे साई आरती, साई भजने तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन चेतक युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत