राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता इच्छापूर्ती ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता इच्छापूर्ती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा उद्घाटन सोहळा परमपूज्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वावीकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
उद्घाटनानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, सर्व रोग निदान शिबीर तसेच रक्तदान शिबिराचा समावेश आहे. या शिबिरांचा लाभ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांचे आयुर्वेदावर आधारित मार्गदर्शन व उपचार विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून नागरिकांना आयुर्वेदिक उपचारपद्धतीविषयी उपयुक्त माहिती मिळणार आहे.
हा कार्यक्रम गणेश भांड यांचे संपर्क कार्यालय, हॉटेल सम्राट पाठीमागे, दत्तनगर, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी येथे पार पडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इच्छापूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत