पुणे(वेबटीम) आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या NH-544G विजयवाडा–बेंगळुरू ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे या महत्त्वाकांक्षी राष्ट्र...
पुणे(वेबटीम)
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या NH-544G विजयवाडा–बेंगळुरू ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पात देवळाली प्रवराचे सुपुत्र जगदीश कदम यांच्या अधिपत्याखालील राजपथ इन्फ्राकॉन ही नामांकित पायाभूत सुविधा कंपनी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. कंपनीकडून या महामार्गाच्या पॅकेज क्रमांक २ व ३ चे बांधकाम सुरू केले असून ७ दिवसात १५६ किमी रस्ता पूर्ण करण्याचा कंपनीचा मनोदय व्यक्त केला असून गिनीज वलर्ड वलर्ड रेकॉर्ड पुन्हा ही कंपनी करणार आहे.
ग्रीनफील्ड महामार्गांच्या बांधकामात विशेष कौशल्य असलेल्या राजपथ इन्फ्राकॉनने देशभरात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. वेगवान कामगिरी, दर्जेदार बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कंपनीने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली असून, महामार्ग बांधकाम क्षेत्रात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानही कंपनीने पटकावला आहे.
NH-544G प्रकल्पामध्ये भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन जिओटेक्सटाईल्स, सीमेंट ट्रीटेड बेस (CTB) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे रस्त्याची मजबुती वाढून तो दीर्घकाळ टिकणारा, सुरक्षित व कमी देखभाल खर्चाचा ठरणार आहे. तसेच पावसाळा, जड वाहतूक आणि हवामानातील बदलांचा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे.
हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर विजयवाडा ते बेंगळुरू दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून व्यापारी, औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही मोठे योगदान मिळणार आहे.
दरम्यान, केवळ बांधकामापुरते मर्यादित न राहता राजपथ इन्फ्राकॉन सामाजिक बांधिलकी जपत CSR उपक्रमांमध्येही सक्रिय आहे. कंपनीने आंध्र प्रदेश पोलिस विभागाला वाहने सुपूर्द केली असून, यामुळे पोलिस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाला गती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.
देशाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि ‘विकसित भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देण्यासाठी राजपथ इन्फ्राकॉन सातत्याने कार्यरत आहे. NH-544G सारख्या मोठ्या ग्रीनफील्ड प्रकल्पांमुळे आंध्र प्रदेशच्या विकासाला नवी दिशा मिळत असून राज्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीसाठी हा महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत