देवळाली प्रवरा/वेबटीम:- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे उद्या गुरुवार दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेहमेळाव्यास विद्यालयाच्या स्थापनेपासून येथे शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी संघाची निवड करण्यात येणार असून, विद्यालयातील विद्यार्थी व विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी या संघाची स्थापना केली जाणार आहे.
विद्यालयाच्या उन्नतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून, सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य पोपट कडूस यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत