राहुरी (वेबटीम) राहुरी कॉलेज परिसरातील रिलायन्स बीपी पेट्रोल पंपावर वाहनधारक ग्राहकांसाठी आकर्षक सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ८ ...
राहुरी (वेबटीम)
राहुरी कॉलेज परिसरातील रिलायन्स बीपी पेट्रोल पंपावर वाहनधारक ग्राहकांसाठी आकर्षक सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ८ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या पंपावर पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांना प्रति लिटर २ रुपये इतकी थेट सूट दिली जाणार आहे.
ही सवलत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार असून, या वेळेत पेट्रोल भरल्यास ग्राहकांना थेट दरात कपात मिळणार आहे. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर ही योजना वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
राहुरी शहर व परिसरातील दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनचालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रिलायन्स बीपी पंप व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. नियोजित कालावधीत आणि ठराविक वेळेत पेट्रोल भरून ग्राहकांना बचतीची संधी मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत