देवळाली प्रवरा(वेबटीम ) देवळाली प्रवरा येथील शिवाजी चौक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लहान मुलांचा दवाखाना 'सेवा क्लिनिक’चे उद्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील शिवाजी चौक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लहान मुलांचा दवाखाना 'सेवा क्लिनिक’चे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिपक अग्रवाल (MD Pediatrics) यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
या क्लिनिकमध्ये आरएमओ डॉ. सय्यद जुनेद सादिक (BHMS, PGDEMS, CCH) हे सेवा देणार असून बालरोग उपचारांसाठी अद्ययावत व विश्वासार्ह सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्घाटन माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळो विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
या क्लिनिकमुळे देवळाली प्रवरा व परिसरातील नागरिकांना बालरोग उपचारांसाठी आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत