मायक्रो फायनान्स अपहार प्रकरणातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला राहुरी पोलिसांकडून अटक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मायक्रो फायनान्स अपहार प्रकरणातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला राहुरी पोलिसांकडून अटक

राहुरी(वेबटीम) राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुवर्ण प्रगती हाउसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेड, शाखा राहुरी येथे ग्राहकांकडून संकलन केलेली रक्कम...

राहुरी(वेबटीम)



राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुवर्ण प्रगती हाउसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेड, शाखा राहुरी येथे ग्राहकांकडून संकलन केलेली रक्कम संस्थेत न भरता परस्पर अपहार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 335/2025, भारतीय दंड संहिता कलम 420, 408 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी अनिल बाळासाहेब पंडित, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. मागील तीन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पोकाॅ. गणेश लिपने यांचे विशेष पथक नेमले.

वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हे पथक रायगड जिल्ह्यात रवाना करण्यात आले. माणगाव पोलीस स्टेशनच्या मदतीने तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे दोन दिवस अथक परिश्रम घेऊन माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दडून बसलेल्या आरोपीस सीताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) व जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे, पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव, पोकाॅ. गणेश लिपने, तसेच सायबर सेल श्रीरामपूर येथील पोहेकॉ. संतोष दरेकर, पोहेकॉ. सचिन धनाड यांचा सहभाग होता.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. राजू जाधव, पोहेकॉ. राहुल यादव व पोकाॅ. गणेश लिपने करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत