राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांचा जागर करत शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेला बळ देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिवसेना संघटक पै रावसाहेब खेवरे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान, अन्यायाविरोधातील निर्भीड भूमिका आणि हिंदुत्वाचा ठाम विचार हीच बाळासाहेबांची खरी ओळख असल्याचे सांगितले.
यावेळी तालुकाप्रमुख सचिन म्हसे बोलताना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड केली नाही. शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून ती मराठी अस्मितेची आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांची चळवळ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांचे विचार अधिकच मार्गदर्शक ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी डॉ संजय म्हसे, कैलास शेळके, भरत धोत्रे, विलास ढोकणे, पोपट शिरसाठ, पोपटराव शेळके, दत्तात्रय शिंदे, ओंकार खेवरे,सतीश माने,शहाजी वराळे, अमित भागवत, सुरज पोटे, अमोल पवार, शिवसैनिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजी व जय महाराष्ट्रच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत