देवळाली प्रवरा(वेबटीम) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे गुरुवारी सकाळी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत येथे शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थी संघाची अधिकृत स्थापना करण्यात आली. यावेळी संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची निवड करण्यात आली. रेवजी सांबरे व दत्ता कडू यांची उपाध्यक्षपदी, उत्तम काशिनाथ मुसमाडे यांची कोषाध्यक्षपदी, तर विद्यालयाचे प्राचार्य पोपट कडूस यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
याशिवाय पालक प्रतिनिधी डॉ. शिवाजी तांबे, सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय नामदेव कदम व सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब चव्हाण यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत