पानेगांव (वार्ताहर) दि.८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध विषयांवर मंथन तसेच शासन स्तर...
पानेगांव (वार्ताहर)
दि.८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध विषयांवर मंथन तसेच शासन स्तरावरून येणाऱ्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावातील प्रत्येक महिलेला सोबत घेणार असल्याचे पानेगांव (ता. नेवासे) ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता भोसले/आंबेकर शासन स्तरावरून विशेष आयोजित केलेल्या ग्रामसभेत
अध्यक्षस्थानावरून बोलतं होत्या. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदन करण्यात आले. वरिष्ठ महिला मार्गदर्शनपर मोलाचा सहभाग घेऊन माहिती दिली तसेच सरपंच भोसले यांनी ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी विविध स्वरूपाच्या योजना माहिती देण्यात आली. उपसरपंच सुरेश जंगले यांनी सामूहिक विवाह सोहळा साठी ग्रामपंचायत विशेष तरतूद करणार असून गावातील इच्छुकांनी ग्रामपंचायतकडे मागणी करावी असे आवाहन करण्यात आले
ग्रामविकासअधिकारी गणेश पाखरे यांनी महिला संदर्भात असणाऱ्या संपूर्ण कायद्याची माहिती व मार्गदर्शन केले तसेच विविध अडचणी समजून घेतल्या व सांगितले
विषय पत्रिका बालविवाह कायदा२००६ मार्गदर्शन हुंडा प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन
कौटुंबिक हिंसाचार महिला चे संरक्षण कायदा २००५ महिला शासकीय योजना लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा बॉक्स कायदा विशाखा मार्गदर्शन तत्त्वे कायदा घरगुती हिंजेदार प्रतिबंध कायदा २००५ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत