देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील शेटेवाडी येथील रहिवासी व मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक सूबेदार (ऑनररी लेफ्टनंट) राज...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील शेटेवाडी येथील रहिवासी व मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे प्रशिक्षक सूबेदार (ऑनररी लेफ्टनंट) राजेंद्र हरिभाऊ आजबे यांना भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते ‘ऑनररी कॅप्टन’ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
राजेंद्र हरिभाऊ आजबे यांचे प्राथमिक शिक्षण शेटेवाडी येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च महाविद्यालयात घेतले, तर उच्च शिक्षण राहुरी कॉलेज पूर्ण केले.
आजबे यांनी २८ जून १९९६ रोजी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती होऊन देशसेवेची सुरुवात केली. तब्बल २९ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. देशासाठी लढलेल्या कारगिल युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या दक्षिण सुदान येथील शांतता मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्यांची विशेष कामगिरी आहे. बॉक्सिंग, कुस्ती, पोहणे आणि नेमबाजी या खेळांमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले आहे.
त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे राष्ट्रपती यांनी त्यांना ‘ऑनररी कॅप्टन’ या पदावर पदोन्नती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत