शेवगाव (वेबटीम) अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांनुसार शेवगाव येथील राजयोग हॉटेलवर छापा टाकून तीन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आल...
शेवगाव (वेबटीम)
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांनुसार शेवगाव येथील राजयोग हॉटेलवर छापा टाकून तीन बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सामाजिक संस्था ‘फ्रिडम फर्म’ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, शेवगाव-गेवराई रोडवरील राजयोग हॉटेलमध्ये मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना बळजबरीने अनैतिक व्यवसायास भाग पाडले जात आहे. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तातडीने सापळा रचण्यात आला.
पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि हॉटेलवर छापा टाकला. कारवाईदरम्यान तीन पीडित तरुणी आढळून आल्या. प्राथमिक तपासात त्यांना एजंटमार्फत अवैध मार्गाने भारतात आणून लॉजमध्ये डांबून ठेवून त्यांच्या इच्छेविरुद्ध देहव्यापारास भाग पाडले जात असल्याचे समोर आले.
या प्रकरणी कृष्णा बापू झिरपे (वय २५), प्रतिक मिलिंद रांधवने (वय २८),बाबासाहेब रामभाऊ अंधारे,अजिंक्य विठ्ठल अंधारे,अमोल पठाडे,अमर मारूती ढाकणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४१, १४३(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५, ६, ७ व १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक गणेश उगले, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख (AHTU) यांच्या सूचनांनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत