देवळाली प्रवरा/वेबटीम:- जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व सत्यजित कदम फाउंडेशन, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त व...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व सत्यजित कदम फाउंडेशन, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रीती सत्यजित कदम यांनी दिली.
या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक नितीन गवळी प्रस्तुत ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात विविध खेळ, स्पर्धा व मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांना सहभागी होता येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट सासू सून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम वृंदावन कॉलनी, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी येथे होणार असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत