नेवासा (तालुका प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातुन अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग व रेल्वे,अंतर्गत रस्ते बरोबरच जगाला ज्ञानाचा संदेश देणारा व ...
नेवासा (तालुका प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातुन अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग व रेल्वे,अंतर्गत रस्ते बरोबरच जगाला ज्ञानाचा संदेश देणारा व अखंड विश्वात असलेल्या वारकरी संप्रदायाला पूजनीय असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेल्या नेवासे भूमीत केंद्र सरकारच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास करिता आवश्यक बाबी मिळाव्यात याकरिता संसदेत लवकरच प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्री व विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
नेवासे येथील पत्रकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना (ठाकरे) जिल्हा समन्वयक मुकुंद शिनगर, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब तनपुरे,
तालुका उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, नितीन जगताप आदी उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले, सध्या लोकसभेत विरोधी बाकावर असलो तरी आतापर्यंत संसदेत ११८ प्रश्न मांडलेले आहे. मतदार संघातील रस्ते, रेल्वेमार्ग व दळणवळण प्रश्न सुटला की सर्वांचा आर्थिकस्तर आपोआप उंचावत असल्याने या प्रश्नासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. साईंबाबांचा आशिर्वाद आणि जनतेचं आसणारे प्रेम त्यामुळे दिल्ली दरबारी अधिकाऱ्यांकडून काम मार्गी लागत असतात.माझी ओळख "आपला माणूस आपल्यासाठी" झाली असल्याने हा शब्दप्रयोग नंतर इतरही आमदार, खासदार व इतर पदाधिकारी जोडून त्या त्या मतदार संघात काम करीत आहेत. ओळख निर्माण करून देणाऱ्या नेवासे तालुक्यास कधीच विसरणार नाही. असे वाकचौरे यांनी सांगून पत्रकार भवनासाठी लवकरच निधीची तरतूद करुन मतदार संघातील पत्रकारांसाठी संसद अभ्यास दौरा आयोजन करण्यात येणार असल्याचे खासदार वाकचौरे यांनी सांगितले.
यावेळी नेवासे प्रेस क्लबचे उपाध्यक्ष कैलास शिंदे,सचिव सुहास पठाडे नेवासे तालुका एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर, जेष्ठ पत्रकार विनायक दरंदले,बन्सी एडके, चंद्रकांत दरंदले, अशोक डहाळे ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकरराव नाबदे, सतिश उदावंत,सुनिल पंडीत,मोहन गायकवाड,बाळकृष्ण पुरोहित,राजेंद्र वाघमारे,अशोक तुवर रमेश शिंदे,दिलीप शिंदे, गणेश बेल्हेकर, संतोष टेमक,अशोक पेहरकर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, युसूफ पठाण,मोहन शेगर, रविंद्र शेटे रमेश पाडळे, विठ्ठल उदावंत,आदीं पत्रकार उपस्थित होते.
प्रस्ताविक सुधिर चव्हाण यांनी केले सुत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे आभार नेवासे एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत