हरिनाम सप्ताहात एकोप्या बरोबरच, सकारात्मक उर्जा निर्माण होते- गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हरिनाम सप्ताहात एकोप्या बरोबरच, सकारात्मक उर्जा निर्माण होते- गडाख

   पानेगांव (वार्ताहर)  नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे ६० वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सप्ताहात संवाद साधतान...

  पानेगांव (वार्ताहर)



 नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे ६० वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सप्ताहात संवाद साधताना माजी मंत्री शंकरराव गडाख हे बोलत होते.

  ६० व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे गावात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणासारख्या उपक्रमांमुळे गावातील एकोपा वाढत असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गावागावात सुरू असलेले धार्मिक सप्ताह हे ऊर्जा केंद्र ठरत असून कथा-कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचा पाया घातला जातो. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुढी पाडव्याच्या निमित्ताने माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी पानेगाव येथे भेट देऊन उपस्थित भाविक व ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामस्थ व पारायण कमिटीच्या वतीने  शंकरराव गडाख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी महालक्ष्मी माता मंदिर, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर आणि हनुमान मंदिर येथे जाऊन गुढी पाडव्याच्या निमित्ताने दर्शन घेतले.

या धार्मिक सोहळ्यामुळे गावात उत्साहाचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे .


यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, सोनई करजगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले, लोकनियुक्त सरपंच सागर आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले,माजी उपसरपंच रामभाऊ जंगले, उद्योजक सुभाष गुडधे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, माजी सरपंच हौशाबापू जंगले,माजी उपसरपंच डॉ जयवंत गुडधे,पानेगांव संस्थेचे जेष्ठ संचालक राजेंद्र जंगले,पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले,माजी सरपंच रमेश जंगले, रमेश गुडधे, द्वारकानाथ चिंधे, भाऊसाहेब काकडे, नानासाहेब जंगले, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, गणेश जंगले, डॉ कडूबाळ काकडे, मच्छिंद्र जंगले, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गुडधे, नामदेव शेलार आदी सह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत