राहुरी/वेबटीम:- राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जन...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून अक्षय कर्डिले हे प्रबळ दावेदार मानले जात असताना आज लोणी प्रवरानगर येथे झालेल्या एका बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अक्षय कर्डिले आणि त्यांचे मेहुणे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी नगर-पाथर्डी तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या बैठकीमागील नेमका उद्देश काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणती रणनिती आखण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचे समजते.तसेच आमदार संग्राम जगताप यांची सक्रियता अक्षय कर्डिले यांच्यासाठी वाढल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत