माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंची उद्यापासून मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंची उद्यापासून मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा

राहुरी/वेबटीम:- राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवायची की ...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवायची की नाही हे जनतेच्या समस्या जाणून घेऊन पुढील निर्णय घेऊ असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले असता.

उद्या सोमवार २० मार्चपासून राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात माजी मंत्री तनपुरे हे जन आशीर्वाद दौरा करत मतदारांशी संवाद साधत आगामी होऊ घातलेली पोटनिवडणूक लढवायची की नाही या संदर्भात मतदारांशी चर्चा करणार आहेत.

उद्या सोमवारी बारगाव नांदूर, बोरटेक, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, कनगर, वडनेर, चिंचाळे, ताहाराबाद आदी भागात हा दौरा तनपुरे हे करणार असून मतदारांचे आशीर्वाद घेत मतदारांशी संवाद साधणार आहेत.

येत्या काळात तनपुरे हे निवडणूक लढवणार का? की या निवडणुकीतून माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत