राहुरी/वेबटीम:- अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड नुकत्याच अहिल्या...
राहुरी/वेबटीम:-
अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड नुकत्याच अहिल्यानगर येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर भवन येथे झालेल्या या बैठकीत संघटनेच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष वेणूनाथ कडू, माजी अध्यक्ष तथा माध्यमिक सोसायटीचे विद्यमान चेअरमन अप्पासाहेब शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र लांडे, एम.एस. लगड, उपाध्यक्ष प्रशांत होन, संचालक संभाजीराजे गाडे, धुमाळ, रकटे तसेच संजय कंगले, उदय गायकवाड, फारुक सय्यद, योगेश पवार आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
प्रसाद शिंदे यांनी शिक्षकांसाठी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडीनंतर बोलताना प्रसाद शिंदे म्हणाले की, “या पदाच्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. माध्यमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करणार आहे. तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.”
त्यांच्या निवडीबद्दल शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत