राहुरी(वेबटीम) तालुक्यातील गुहा येथे श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या संकल्पनेतून अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त विविध धार्मिक ...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील गुहा येथे श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या संकल्पनेतून अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य व नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. 17 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात सामूहिक श्री विष्णुसहस्रनाम अनुष्ठान, अकरा कुंडी श्री महाविष्णू याग, तीर्थयात्रा तसेच गावधोंडा व महाप्रसाद यांचा समावेश आहे.
पुरुषोत्तम मासात केलेल्या उपासना, व्रत, जप-तप व दान यांना विशेष महत्त्व असून “अधिकस्य अधिक फलम्” या उक्तीनुसार अधिक पुण्यप्राप्ती होते. या काळात भगवान महाविष्णूंची पूजा, श्री विष्णुसहस्रनाम पठण व तुलसी अर्चन विशेष फलदायी मानले जाते.
गुढीपाडव्यापासून प्रत्येक भाविकाने आपल्या घरी दररोज श्री विष्णुसहस्रनाम पठण करून तुलसी अर्चन करावे व त्याची नोंद ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरा कुंडी श्री महाविष्णू याग दिनांक 18, 19 व 20 मे 2026 रोजी गुहा येथे अकरा कुंडी श्री विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या यागात दररोज होम-हवन व एक लक्ष तुलसी अर्चना होणार असून इच्छुक भाविकांना एक तास ते तीन दिवसांपर्यंत सहभागी होता येणार आहे. मुक्कामाची व्यवस्था देखील करण्यात आली असून 20 मे रोजी पूर्णाहूती होणार आहे.
तीर्थयात्रा आयोजन 21 मे 2026 रोजी गुरुपुष्यामृत योगानिमित्त विशेष तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे. लक्झरी बसद्वारे विविध पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार असून प्रवास कालावधी दोन ते तीन दिवसांचा राहणार आहे. राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे.
गावधोंडा व महाप्रसाद 25 मे 2026 रोजी गंगा दशहरा निमित्त गावधोंडा व श्री महाविष्णू यागाचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कीर्तन, भजन, पूजा-अर्चा यांचे आयोजन होऊन अनुष्ठानाची सांगता होणार आहे.
हे सर्व कार्यक्रम श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या स्वखर्चातून पूर्णतः नि:शुल्क आयोजित करण्यात येत असून अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्कासाठी:
श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी: 9823506235 / 9420312011
चि. सोहम कुलकर्णी गुरुजी: 9420912066 / 9552079909
इच्छुक भाविकांनी वरील क्रमांकांवर संपर्क साधून सहभाग नोंदवावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत