राहाता (वार्ताहर) बालविवाह हुंडाबळीच्या घटना अजूनही समाजात घडत आहेत या समस्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत अ...
राहाता (वार्ताहर)
बालविवाह हुंडाबळीच्या घटना अजूनही समाजात घडत आहेत या समस्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर सतर्क रहा असे आवाहन सरपंच पल्लवी इले यांनी केले. ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या आदिशक्ती अभियानात
महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
सरपंच पल्लवी इले यांनी केले .
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एस व्ही कोतकर ,उपसरपंच दीपक वहाडणे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष , पोलीस पाटील योगिनी धनवटे, राजेंद्र धनवटे ,रामनाथ वहाडणे, संदीप बनकर अदी सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालविवाह म्हणजे 18 वर्षाखालील मुलींचा आणि 21 वर्षाखालील मुलांचा विवाह, बालविवाह मुळे मुलींचे शिक्षण तुटते त्यांचे स्वतंत्र हिरावले जाते आणि त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर हुंडाबळी म्हणजे विवाहाच्या वेळी वर पक्षाकडून पैसे किंवा संपत्ती मागणे हुंडाबळीमुळे अनेक महिलांना शारीरिक व मानसिक क्षण करावा लागतो काही वेळा त्यांचा मृत्यू होतो.
अशा सर्व घटना थांबवण्यासाठी जनजागृती व एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आजूबाजूला व समाजात अशा घटना घडत असतील तर त्वरित पोलीस स्टेशनला कळवावे, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा. समाजात जनजागृती करण्यासाठी शाळा कॉलेज व सामुदायिक कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत