शिर्डी (वार्ताहर) अनेक सामाजिक संघटना प्रतिष्ठाण सामाजिक विवाह सोहळा संपन्न करत असतात. या सोहळ्यामध्ये अनेकांची लग्न विना मोबदला लावली जात...
शिर्डी (वार्ताहर)
अनेक सामाजिक संघटना प्रतिष्ठाण सामाजिक विवाह सोहळा संपन्न करत असतात. या सोहळ्यामध्ये अनेकांची लग्न विना मोबदला लावली जातात. यामुळे वाढत्या महागाईचा फायदा मुला मुलींच्या आई वडिलांना होतो.
शिर्डी येथील साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी सामाजिक विवाह सोहळा पार पडतो. यावर्षी तब्बल 51 जोडप्यांचा सामाजिक व सोहळा पार पाडला. या सोहळ्यामध्ये राहाता तालुक्यातील नपावाडी येथील ग्रामस्थांनी देखील उस्फूर्त सहभाग घेतला.
सामुदायिक सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांचा नपावाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. आपल्या मुला मुलींचे विवाह सामाजिक विवाह सोहळ्यातच करा अनावश्यक खर्चात फाटा द्या असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.परिसरातील आर्थिक खर्च सध्या शेतीवर अवलंबून आहे मात्र वेळेत पाऊस न झाल्यामुळे शेतीची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशातच आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून उसणवाडी करून लग्न उरकली जातात. यामध्ये लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च होतो. मुला मुलींचे लग्न झाल्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी आई बापाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या मुला मुलींचे लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत