राहुरी(वेबटीम) गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून विविध ध...
राहुरी(वेबटीम)
गुहा येथील श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
सोमवार दि. २ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता कानिफनाथ महाराज मंदिरासमोर ग्रामस्थांच्या वतीने मानाची होळी पेटविण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता होम हवन होईल.
मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्रीफळ फोडून यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
शनिवार दि. ७ मार्च रोजी सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत काठी मिरवणूक काढण्यात येईल.
रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता होम हवन, सकाळी ७ वाजता गंगाजल पूजन व कावड मिरवणूक व अभिषेक, सकाळी १० वाजता महाआरती होईल. सायंकाळी ६ वाजता छबीना मिरवणूक, सायंकाळी ७.३० वाजता महाआरती तर रात्री ९ ते १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध नाथभक्त श्री. आकाश शिंदे यांचा नाथ गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता कलावंत हजऱ्यांच्या यांच्या कार्यक्रमाने सुरुवात होईल. सकाळी १० वाजता महाआरती, सायंकाळी ५ ते ६ वाजता भव्य कुस्ती स्पर्धा (हंगामा) आणि रात्री ९ ते १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात्रोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी, गुहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत