देवळाली प्रवरा येथ चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त किर्तन महोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथ चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त किर्तन महोत्सव

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड येथे ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व भव्...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया रोड येथे ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा व भव्य सप्ताह कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दि. १ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.


या सप्ताहात दररोज सकाळी नवनाथ  ग्रंथ पारायण व विविध धार्मिक विधी, तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद पंगत होणार आहे. 


 या कालावधीत ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर, निखिल महाराज बानकर,  चैतन्य महाराज मापारे, सुभाष महाराज विधाटे, मधुकर महाराज पवार,  बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज शास्त्री, दुर्गप्रसाद महाराज तिडके आदी कीर्तनकार आपले विचार व कीर्तनसेवा सादर करणार आहेत.


रविवार दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९  बाबानंद महाराज वीर यांचे काल्याचे किर्तन व  महाप्रसाद  कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॐ चैतन्य कानिफनाथ प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांनी केले आहे.


संपूर्ण सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय मेजवानी अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत