राहुरी फॅक्टरीत कॅशलेस आरोग्यसेवेची मोठी सुविधा सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत कॅशलेस आरोग्यसेवेची मोठी सुविधा सुरू

  राहुरी फॅक्टरी  राहुरी फॅक्टरी , देवळाली प्रवरा व परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गंभीर आजार किंवा तातडीच्या उपचारांसाठी अहि...

 राहुरी फॅक्टरी



 राहुरी फॅक्टरी , देवळाली प्रवरा व परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गंभीर आजार किंवा तातडीच्या उपचारांसाठी अहिल्यानगरला धाव घेण्याची गरज उरलेली नाही. सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व नामांकित आरोग्य विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध झाली आहे.

या सुविधेमुळे रुग्णांना उपचाराच्या वेळी मोठी रक्कम तत्काळ भरण्याची गरज भासणार नाही. उपचारांचा खर्च थेट विमा कंपनीकडून केला जाणार असल्याने आर्थिक ताण कमी होणार आहे. तसेच नगरला जाण्या-येण्याचा वेळ आणि त्रासही वाचणार आहे.

रुग्णालयात आयसीयू आणि ट्रॉमा केअरची अद्ययावत सुविधा उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार केले जातात.

 उपलब्ध कंपन्या सुविधा

स्टार हेल्थ, टाटा एआयजी, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, बजाज अलायन्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स, निवा बुपा, केअर हेल्थ यांसह ३० हून अधिक कंपन्यांची कॅशलेस सुविधा येथे उपलब्ध आहे.

“गरजू रुग्णांना आता लांब न जाता, योग्य वेळी आणि दर्जेदार उपचार आपल्या गावातच मिळणार आहेत,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

📍 पत्ता

 श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर

📞 संपर्क: ८३९०२१९१९८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत