देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत वाढीव पाणी पट्टी विरोधात नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांचा ६ मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत वाढीव पाणी पट्टी विरोधात नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांचा ६ मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदे...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदेशीर अन्यायकारक व नागरिकांच्या विरोधातील निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी ६ मार्च २०२६ रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या कार्यालयावर धरणे आंदोलनाचा नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.


देवळाली प्रवरा नगर परिषदेने वाढवलेली पाणीपट्टी ही सर्वसामान्य नागरिक यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या असून लोकशाही मूल्यांना तिलांजली जनतेवर जबर आर्थिक बोजा टाकणारी असून नागरिकांच्या व्यवहारी व निषेधार्य आहे नगरपरिषदेतील नागरिक अगोदरच महागाई बेरोजगारी वीजदर वाढ व विविध कारभारामुळे त्रस्त असताना पाणीपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यावर दरवाढ करणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची जाणीवपूर्वक परीक्षा घेण्याचा प्रकार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत