नाशिक(वेबटीम) रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी- जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक २७ व ...
नाशिक(वेबटीम)
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी- जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२६ सकाळी ९ वा. स्थळ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, सिव्हिल हॉस्पिटर समोर, नाशिक शहर, नाशिक येथे संपन्न होत आहे. सोहळ्याचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी साधक दिक्षा आणि २८ फेब्रुवारी रोजी उपासक दिक्षा सुद्धा संपन्न होणार आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व आध्यात्मिक कार्य अविरत केले जातात. त्यामध्ये विशेष म्हणजे देहदान आज पर्यंत १८० लोकांनी देहदान केले आहे, अवयव दान १३३ लोकांनी अवयव दान केले आहे, अपघात ग्रस्त साठी महामार्गावर ५३ अॅम्बुलन्स विनामूल्य सेवा देत आहेत, सीबीएससी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते, प्रत्येक वर्षी जीवनदान महाकुंभ मार्फत २०२५ मध्ये १,३७,२७० रक्तकुपिका आणि २०२६ मध्ये १,७१,१५० रक्तकुपिका महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढीला देण्यात आले आहे, वसुंधरा संवर्धन साठी जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या जन्मोत्सव निमित्ताने २ ऑक्टोंबर ते २१ ऑक्टोंबर एक पेड मां के नाम उपक्रम अंतर्गत १,१९,४४० झाडे २०२५ मध्ये लावण्यात आली आणि त्या झाडाचे संगोपन करण्याचे कार्य सुरू आहे, ४,५९८ कच्चे बंधारे बांधून पाणी अडवा पाणी जिरवा चा संकल्प राबवण्यात आला, अशा प्रकारचे अनेक सामाजिक कार्य करण्यात येत आहेत.
अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून माणसाच्या जीवनातील अडचणी कशा सुटतील व माणूस सुखी कसा होईल यावर जगद्गुरुश्रींचे मार्गदर्शन २७ आणि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रम निमित्ताने होणार आहे आणि भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. भक्तगणांच्या सोयीसाठी मैदानावर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. त्या ठिकाणी महाप्रसादाचे व्यवस्था असणार आहे अशा या होणाऱ्या भव्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ समस्त भक्त गणांनी घ्यावा असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पिठाच्या उपपिठ उत्तर महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत