देवळाली प्रवरा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया शिवेवर असलेल्या भांड वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घ...
देवळाली प्रवरा
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील टाकळीमिया शिवेवर असलेल्या भांड वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी शरद रामचंद्र भांड यांच्या मालकीच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सौरभ मुसमाडे यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. जी. आटाकै व श्री. सिनारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सदर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांनी तातडीने पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत