राहुरी फॅक्टरीतील २५ वर्षीय सिद्धार्थ उर्फ बंटी बागुल यांचे अकस्मित निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील २५ वर्षीय सिद्धार्थ उर्फ बंटी बागुल यांचे अकस्मित निधन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ उर्फ बंटी सुरेश बागुल याचे अकस्मित निधन झाले आहे. बंटी हा...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ उर्फ बंटी सुरेश बागुल याचे अकस्मित निधन झाले आहे.

बंटी हा संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयात एम.फार्मचे शिक्षण घेत होता. काल रात्री झोपेत असतानाच त्याचे अकस्मित निधन झाले.

मित्रांनी त्यास रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषीत केले.

मयत बंटी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथे आणण्यात आला. आज सोमवारी सायंकाळी ७ वाजता प्रसादनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सिद्धार्थ उर्फ बंटी हा अत्यंत  शांत व संयमी स्वभावाचा होता.  मयत बंटीच्या पश्चात आई-वडील,भाऊ,बहिण,चुलते चुलती असा मोठा परिवार आहे. राहुरी फॅक्टरी येथील आनंदऋषीजी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश बागुल यांचा मुलगा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत