अहिल्यानगर सोनई पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सपोनि विजय माळी (सध्या राहुरी पोलीस ठाणे) यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मागील स...
अहिल्यानगर
सोनई पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सपोनि विजय माळी (सध्या राहुरी पोलीस ठाणे) यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत वेळोवेळी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सूचनांचे पालन न झाल्याने सोनई पोलीस ठाणे हद्दीत अग्नीशस्त्रासह खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत