राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना म...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.
समर्थनगर परिसरातील योगेश्वर कॉलनी परिसरात पवार यांचे भाडोत्री घर असून या ठिकाणी आष्टी परिसरातील पिंपळा येथील बाबा गरगडे व कुटुंब भाडोत्री वास्तव्यास होते.
काल शुक्रवारी ते हॉस्पिटलकामासाठी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानांची उचकापाचक करत १५ हजार रुपये रोकड लंपास केली आहे.
आज सकाळी चोरी झाल्याचे लक्षात घरमालक श्री.पवार व गरगडे यांनी राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.
चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी समर्थनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
राहुरी शहरात कालच पहाटे भरपेठेतील सेंट्रल बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना असताना पुन्हा आज ही चोरी उघड झाल्याने पोलिसांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत