राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील आदिनाथ वसाहत येथे महाशिवरात्री उत्सव २०२६ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रव...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील आदिनाथ वसाहत येथे महाशिवरात्री उत्सव २०२६ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम पार आहे.
महाशिवरात्री निमित्त दिवसभर शिवपूजन व महारुद्र अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्त सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रवचन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असून ह.भ.प. इंगळे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भगवान शंकराच्या महिम्याचे विवेचन करणार आहेत.
त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त आदिनाथ वसाहत राहिवासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत