गणेगाव रस्त्यावर बोअरवेल मोटार व केबल चोरी,अनेक शेतकऱ्यांना फटका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेगाव रस्त्यावर बोअरवेल मोटार व केबल चोरी,अनेक शेतकऱ्यांना फटका

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी परिसरातील गणेगाव रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी शेतातील बोअरवेलवरील इलेक्ट्रिक मोटार, केबल व स्टार्टर चो...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी परिसरातील गणेगाव रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी शेतातील बोअरवेलवरील इलेक्ट्रिक मोटार, केबल व स्टार्टर चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत अविनाश शंकर वरखडे (वय ३४, व्यवसाय- शेती, रा. राहुरी फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतातील बोअरवेलवर बसविण्यात आलेली मोटार व स्टार्टर हे दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जागेवर होते. मात्र दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शेतात गेल्यानंतर मोटार, केबल व स्टार्टर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.


चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ८ हजार रुपये किमतीची मोटार, ९ हजार रुपये किमतीची सुमारे ५०० फूट केबल आणि ३ हजार रुपये किमतीचा स्टार्टर असा एकूण सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद आहे.या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



*या शेतकऱ्यांनाही बसला चोरीचा फटका*

 यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरवेलवरील मोटारी व केबल चोरीला गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. काशिनाथ गंगाधर सोंडे, महेश दत्तात्रय कोबरणे, पंडीत रामभाऊ कोबरणे, विलास एकनाथ कोबरणे यांच्या मोटारी चोरीला गेल्या असून ज्ञानदेव कचरु झांबरे, अनिल झुंबर झांबरे, दत्तात्रय देवराम वाणी, गणपत श्रीधर गव्हाणे व रवि कचरु झांबरे यांच्या मोटारींच्या केबली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत